पंचद्रवीड ब्राह्मण सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी
महाराष्ट्रान्ध्र द्राविडा: कर्नाटाश्चैव गुर्जरा:। द्राविडा: पंचधा प्रोक्ता विंध्यदक्षिणवासिन: ॥ (भारतीय संस्कृतीकोष, खंड त......प)
(महाराष्ट्र, आंध्र, द्रवीड(तामिळनाडू), कर्नाटक व गुजरात या विंध्याद्रीच्या दक्षिणेकडील पाच प्रांतातील (राज्यातील) ब्राह्मणांना पंचद्रवीड म्हणतात.)
सन १९२५ मध्ये सहकारी कायदा अस्तित्वात आल्यानंतर तत्कालीन सावंतवाडी संस्थांनातील दिवाण कै. विष्णू चंद्रचूड यांच्या पुढाकाराने सन १९३३ साली पंचद्रवीड ब्राहमण सहकारी पतपेढीची स्थापना झाली व सन १९३४ मध्ये सहकार खात्याकडे नोंदणी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. वेदमूर्ती रामचंद्र शंकर सप्ते व सचिव कै.श्रीकृष्ण विनायक साधले होते. सन १९४२ मध्ये कै.श्रीकृष्ण विनायक साधले यांचे वयाच्या ४० व्या वर्षी आकस्मिक निधन झाल्याने पुढील १०-१२ वर्षे संस्थेचे काम ठप्प झाले होते. त्यानंतर सन १९५४ च्या सुमारास सहकार खात्याने नव्याने रुजू झालेल्या कै. नारायण विठ्ठल जोग , सातार्डा, सावंतवाडी यांच्या अथक प्रयत्नाने या संस्थेचे पुनरुज्जीवन झाले. संस्था आज जी भक्कम पायावर उभी आहे तिचे श्रेय कै. नारायण विठ्ठल जोग यांना दिले तर ते चूक ठरणार नाही.
सुरुवातीपासून या पतसंस्थेचे स्वरूप ब्राह्मण समाजाची , ब्राह्मण समाजाने , ब्राह्मण समाजासाठी चालवलेली पतसंस्था असे राहिले आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या संस्थेच्या प्रगतीला मर्यादा पडलेल्या आहेत. मात्र आता गेल्या काही वर्षात कालानुरूप संस्थेने आपल्या धोरणात बदल करून आर्थिक व्यवहार समाजातील सर्व घटकांना खुले केले आहेत.
संस्थेचे प्रधान कार्यालय सावंतवाडी येथे असून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली , वेंगुर्ला व देवगड येथे शाखा आहेत. संस्थेचे प्रधान कार्यालय तसेच सावंतवाडी, कणकवली , वेंगुर्ला व देवगड शाखा स्वामालकीच्या जागेत कार्यरत आहेत.
सचिव , पाच शाखा व्यवस्थापक व पाच लिपिक असे अकरा कर्मचारी पतसंस्थेचे दैनंदिन कामकाज करतात. तर संपूर्ण जिल्ह्यात पंचवीस प्रतीनिधी अल्पबचत (पिग्मि) व आवर्त (रिकारींग ) ठेवी संस्थेसाठी जमा करतात. गेली ७ वर्षे (सन २०१८-१९ ते सन २०२४-२५ ) संस्था सातत्याने ११% किंवा त्यापेक्षा जास्त दराने सभासदांना लाभांश देत आली आहे.
का निवडाल आम्हालाच?
इतर सेवा
आपल्या संस्थेच्या सर्व ग्राहकांना मोबाइल बॅंकिंगची सुविधा विनामूल्य दिलेली आहे. त्यामुळे खाते शिल्लक , निधी हस्तांतरण , मिनी स्टेटमेंट , मोबाइल आणि डिटीएच रीचार्ज, लाईटबिल,गॅस , विमा , इ. सुविधा दिलेल्या आहेत.
आपल्या संस्थेच्या ग्राहकाला कोणत्याही बँक खात्यातून थेट त्याच्या संस्थेतील खात्यात रक्कम प्राप्त करता येते. त्यामुळे चेकच्या ऐवजी ऑनलाइन रक्कम पाठविणे अतिशय सोपे झाले आहे. आपल्या संस्थेचा आयएफएससी कोड ICIC0000106 हा आहे.
आपल्या संस्थेच्या ग्राहकाने कोणताही जमा/ नावे व्यवहार केल्यास त्याचा एस एम एस तात्काळ त्याच्या मोबाइलवर जातो त्यामुळे बाकी अचूक समजते व पारदर्शकता निर्माण होते .
संस्थेच्या विविध ठेव योजना
कर्ज व्याजदर